चोपडा-दहावी बोर्डाच्या परिक्षेत तालुक्यातून कु.रोहिणी रविंद्र माळी ही 98.60% गुण प्राप्त करुन प्रथम आली आहे.तसेच चि.गितेश पंकज चौधरी हा 97.40% इतके गुण प्राप्त करुन विवेकानंद विद्यालयातून प्रथम व तालुक्यातून तिसरा आला आहे.यांचा सत्कार त्यांच्या पालकासह मा.विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी चोपडा पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गंगाधर पाटिल,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सनी सचदेव,रा.काँ.युवक तालुकाध्यक्ष  मनोज पाटिल,रा.यु.काँ.शहर कार्याध्यक्ष प्रफुल पाटिल तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक वडील रविंद्र माळी व पंंकज चौधरी हे देखील उपस्थित होते.
विशेषः म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील या दोन्ही विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटीवर हे यश प्राप्त केले आहे.यासमयी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना फेटा बांधुन पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ व सॕक देऊन सत्कार केला.तसेच त्यांच्या पालकांचा सत्कार चंद्रहासभाई यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आला.तसेच सत्काराप्रसंगी बोलतांना अरुणभाई म्हणाले कि भविष्यातही शिक्षणात आपण  अशीच प्रगती करावी व पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.