लोक न्यूज
अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ लि. यांच्या पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणुकीसाठी २०२५ ते २०३० या कालावधीकरिता “शेतकरी पॅनल” तर्फे उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विविध मतदार संघांमध्ये अनुभवी, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
व्यक्तीशः मतदार संघातून अॅड. पाटील गिरीष प्रकाशराव (लोण सीम), प्रा. पाटील सुभाष सुकलाल (शिरुड), पाटील सुरेश पिरन (निंभोरा), प्रा. पवार श्याम साहेबराव (खेडी प्र.ज.) आणि सुर्यवंशी भागवत केशव (खवशी) हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. या उमेदवारांनी सहकार, कृषी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असल्याचे पॅनलतर्फे सांगण्यात आले.
महिला राखीव मतदार संघातून पाटील सिंधूबाई प्रताप (अंबारे) आणि पाटील सुनिता विनायक (एकलहरे) या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. इतर मागास वर्ग मतदार संघातून प्रा. पवार दिनेश उत्तमराव (गांधली), अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून सुर्यवंशी ताराचंद सिताराम (करणखेडे) तर विमुक्त जाती-भटक्या जमाती मतदार संघातून भागवत बन्सीलाल आसाराम (लोंढवे) हे निवडणूक लढवत आहेत.
या निवडणुकीसाठी मतदान शनिवार, दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत साने गुरुजी विद्यालय येथे होणार आहे.
“शेतकरी पॅनल” तर्फे सर्व सन्माननीय मतदारांना आवाहन करण्यात आले असून, पॅनलच्या सर्व उमेदवारांना “छताचा पंखा” या निवडणूक चिन्हावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मतांनी विजयी करण्याची विनंती करण्यात आली आहे.