राज्यात तालुकास्तरावर पहिले खाजगी कोविड हॉस्पिटल अमळनेरात सुरू होणे गौरवास्पद-आ.अनिल पाटील
वरद विनायकाच्या नावाने कोविड भस्मासुराचा नाश होईल-मा आ कृषिभूषण पाटील
अमळनेरात भव्य वरद विनायक हॉस्पिटल कोविड सेंटरचे उद्घाटन
अमळनेर-शहरातील पाच तज्ञ डॉक्टरांनी एकत्रित येत कोविड च्या प्रादूर्भावात रुग्णांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या परवानगीने वरद विनायक हॉस्पिटल कोविड सेंटरच्या नावाने एक चांगली देणं दिली असून संपूर्ण राज्यात तालुकास्तरावर सुरू झालेले हे पहिले कोविड हॉस्पिटल आहे,हे हॉस्पिटल अमळनेर सह जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी वरदान ठरेल अशी भावना आ अनिल पाटील यांनी अमळनेरातील कलागुरु मंगल कार्यालयात सुरू झालेल्या खाजगी कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली.
तर माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी या कोविड हॉस्पिटलचे नाव वरद विनायक आहे,विनायक म्हणजे साक्षात विघ्नहर्ता असल्याने वरद विनायक नावाचे हे हॉस्पिटल कोविड सारख्या भस्मासुरचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.अमळनेर शहरातील तज्ञ फिजिशियन डॉ अविनाश जोशी,डॉ निखिल बहुगुणे,डॉ किरण बडगुजर,डॉ प्रशांत शिंदे आणि डॉ संदीप जोशी आदींनी एकत्रित येत धुळे रोड येथे असलेल्या सरजू गोकलाणी यांच्या भव्य कलागुरु मंगल कार्यालयात शासनाच्या परवानगी ने भव्य वरद विनायक हॉस्पिटल नावाचे कोविड सेंटर निर्माण केले असून एकाच सुमारे 75 रुग्णांची सोय असणाऱ्या या हॉस्पिटलचे काल दि 1 ऑगस्ट रोजी आ.अनिल पाटील,माजी आ कृषिभूषण साहेबराव पाटील,जि प सदस्या सौ जयश्री पाटील आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले,याप्रसंगी माजी आ डॉ बी एस पाटील,प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद कुमार वाघ,न पच्या मुख्याधिकारी डॉ विद्या गायकवाड,पोलीस निरीक्षक अंबादास मोरे,जेष्ठ सर्जन डॉ अनिल शिंदे,आयएमए चे अध्यक्ष डॉ नितीन पाटील,ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे,डॉ शरद बाविस्कर,डॉ मयुरी जोशी,प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डिगंबर महाले,नगरसेवक निशांत अग्रवाल,श्यामकांत पाटील,पो को डॉ शरद पाटील यासह हॉस्पिटलचे संचालक डॉ अविनाश जोशी,डॉ निखिल बहुगुणे,डॉ किरण बडगुजर,डॉ प्रशांत शिंदे व डॉ संदीप जोशी उपस्थित होते.उपस्थित सर्वांनी संपुर्ण हॉस्पिटलची पाहणी करून उपलब्ध केलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले.
या आहेत हॉस्पिटलमध्ये सुविधा
या कोविड हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे याठिकाणी 21 बेडचे वातानुकूलित आयसीयू असून साधारणपणे जनरल बेड 30 तर
वातानुकूलित रूम मध्ये 25 बेड आहेत,कुत्रीम श्वासोच्छ्वासाचे मशिन व्हेंटिलेटर सध्या 2 असून लवकरच एकूण 5 व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध असणार आहेत,याव्यतिरिक्त पाच बायपेप मशिन,मल्टीपॅरा मोनिटर्स,डिफ्रिबिलेटर्स,सेंट्रल ऑक्सिजन,ऑक्सिजन कोन्स्ट्रेटर,अद्यावत ईसीजी,डिजिटल एक्सरे,एबीजी मशीन,तसेच 24 तास पॅथॉलॉजी व मेडिकल सुविधा उपलब्ध असणार आहे.
डॉक्टर्स सह 35 ते 40 जणांचा आहे
या कोविड हॉस्पिटलमध्ये प्रमुख पाच डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली 35 ते 40 जणांचा स्टाफ कार्यरत असणार आहे,यात आर एम ओ डॉक्टर्स,अनुभवी नर्सेस व वॉर्डबॉय 15,क्लिनिंग स्टाफ,सिक्युरिटी गार्ड,पॅथॉलॉजिस्ट,फार्मासिस्ट आदी कार्यरत असणार आहेत.
कोविड चाचणी देखील येथेच होणार
सदर कोविड सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांची कोविड तपासणी अँटीजन टेस्ट अथवा स्वॅब घेऊन याच हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार असून त्याचा अहवाल देखील तात्काळ प्राप्त होणार असल्याने तात्काळ रुग्णांवर उपचार सुरू केले जाणार आहेत.
बालरुग्णांवरही होणार उपचार
कोरोनाग्रस्त बालकांवर देखील या रुग्णालयात उपचार होणार असून अमळनेर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ नितीन पाटील व डॉ शरद बाविस्कर हे बाल रुग्णांवर उपचार करणार आहेत.
रुग्णांसाठी भोजन व कॅटिंग व्यवस्था
या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी भोजन,नास्ता व चहाच्या व्यवस्थेसाठी कॅटिंगची सोय करण्यात येणार असून स्थानिक रुग्णांना घरून टिफिन मागविण्याचीही मुभा असणार आहे.याव्यतिरिक्त आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
रुग्णांना परिपूर्ण सुविधा व उपचार देऊन वाजवी दर आकारा-आ अनिल पाटील
आ अनिल पाटील बोलताना म्हणाले की अमळनेर तालुक्यात कोविड चा प्रादुर्भावात 700 रुग्ण बाधित झाले असले तरी 500 रुग्ण बरेही झालेत हा आनंद,सुरवातीपासून सर्व खाजगी डॉक्टर चेही सहकार्य लाभले आहे,शासकीय स्तरावर परिपूर्ण सुविधा आज असली तरी काही रुग्णांना उपचारासाठी बाहेरगावी जावे लागत होते आणि तशी सोय जिल्ह्यातही कमीच होती,परंतु आज अमळनेरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी भव्य परिपूर्ण कोविड हॉस्पिटल सुरू झाले हे आनंददायी आहे, याठिकाणी डॉक्टरांसह सर्व स्टाफ चांगला आहे,ते
24 तास सेवा देणार आहेत,तालुक्यातील जनतेसाठी व्यवस्था करण्याचा हा स्तुत्य आणि प्रामाणिक प्रयत्न आहे,नक्कीच वाजवी दरात येथे सेवा दिली जाईल हा विश्वास आहे,तरीही डॉक्टरांनी रुग्णांना येथे जास्तीतजास्त सुविधा आणि उपचार देऊन बिल देखील वाजवीच आकरावे अशी विनंती आमदारांनी केली.
खाजगी डॉक्टरांचे अनमोल सहकार्य-प्रांत सीमा अहिरे
उद्घाटन प्रसंगी प्रांताधिकारी सीमा अहिरे म्हणाल्या की अमळनेर येथील खाजगी डॉक्टरांनी कोविड प्रादुर्भावात सतत मदत केली आहे,आज स्थितीत ग्रामिण रुग्णालयातील शासकीय कोविड रुग्णालयात उत्तम सुविधा मिळत असून तेथे सुरवातीला 30 बेड ची क्षमता असताना आता 40 च्या आसपास बेड उपलब्ध होऊन योग्य उपचार मिळत आहेत,परंतु बेड शिल्लक नसल्यास अथवा रुग्णास हाय्यर सेंटरची गरज भासल्यास काही रुग्णांना बाहेरगावी पाठवावे लागत होते मात्र आम्ही सर्व स्थानिक फिजिशियन विनंती केल्याने त्यांनीही तयारी दर्शवली यामुळे तालुका लेव्हल ला पाहिले खाजगी कोविड हॉस्पिटल अमळनेरात सुरू झाले आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
चांगल्या भावनेतुंनच आम्ही एकत्र आलो-डॉ संदीप जोशी
या कोविड रुग्णालयाचे संचालक डॉ संदीप जोशी बोलताना म्हणाले की कोविड रुग्णांची संख्या वाढून यात सरकारी यंत्रणा थोडी कमी पडत असल्याने हे कोविड हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे,सरकारी यंत्रणेमध्ये स्टाफ व सुविधा अपूर्ण असल्यामुळे अडचण होती,यामुळे चांगल्या भावनेतूनच आम्ही एकत्र आलो आहोत,या हॉस्पिटलसाठी आ अनिलदादा,साहेबराव दादा व प्रशासनाने आम्हाला मदत करून प्रोत्साहन दिले,आता कुणालाही उपचारासाठी नाशिक पुणे जायची गरज नाही हा आमचा विश्वास आहे,याठिकाणी गरीब रुग्णांना देखील आम्ही सेवा देणार आहोत,याशिवाय प्रायव्हेट कोविड टेस्ट ची सुविधा आम्ही दिली आहे,
बाहेर गावातील रुग्णांची देखील सोय आम्ही करणार आहो,याशिवाय सर्वसामान्य लोकांना परवडेल असेच दर आकारले जातील यामुळे काळजी नसावी अशी ग्वाही डॉ जोशी यांनी दिली.
सेवा हाच उद्देश-,डॉ अविनाश जोशी
या कोविड हॉस्पिटलचे डॉ अविनाश जोशी बोलताना म्हणाले की आजपासून हे रुग्णालय रुग्णांसाठी सुरू खुले झाले आहे, याठिकाणी वाजवी दरातच सेवा आम्ही देणार आहोत,विश्वास ठेवा सेवा देण्याच्या उद्देशानेच हे हॉस्पिटल आम्ही सुरू केले असल्याचे डॉ जोशी यांनी सांगितले.