जळगाव - शहरातील राखी विक्रेत्यांकडुन राखी खरेदी करतांना महिला


जळगाव, (अमोल जोशी)-     रक्षाबंधनानिमित्त आज रविवार असूनही बाजारपे'ेत महिला व युवतींची राख्या खरेदीसा'ी गर्दी झाली होती. अनेक जण कोरोनामुळे रक्षाबंधनास जाणे टाळणार असले तरी गावात नात्याचे बंधू असलेल्यांना या भगिनी राखी बांधून रक्षाबंधन आहेत तेथेच साजरे करणार असल्याने राख्या खरेदीसा'ी गर्दी दिसून आली. 
शहरातील टॉवर चौक, गणेश कॉलनी, शिव कॉलनी, गुजराल पेट्रोल पंप यासह परिसरातील मुख्य भागात राखी विव्रेâत्यांनी दुकाने थाटली होती.कोरोना महामारीने कहर केला आहे. जिल्ह्यात वाढत्या रूग्ण संख्येमुळे लॉक -अनलॉकचा खेळ सुरूच आहे. यामुळे रक्षाबंधनासा'ी शहरात राख्या विक्रीतून होणारी लाखोची उलाढाल यंदा हजारावर आली आहे. आज महिला व युवतींनी राख्या खरेदीसा'ी बाजारात गर्दी केली होती. त्यातही ४० ते १०० रूपये डझनाच्या दरातील राख्यांना मागणी होती. दरवर्षी असणाNया विविध प्रकारातील आकर्षक व महागडया राख्यांना कोणीही विचारले नाही
रक्षा बंधन हा भाऊ-बहीणीचा पवित्र बंधनाचा सण असतो. त्यामुळे रक्षाबंधनाला बहीण भावाकडे येते. किंवा भाऊच बहिणीकडे जाऊन राखी बांधून भाऊ-बहीणीचा पवित्र नात्याचा ऋणानुबंध घट्ट करतात. मात्र कोरोनामुळे कोणीही घरा बाहेर न जाण्याचे प्रशासनाने केलेले आवाहन व प्रवासासा'ीचे वाहने बंद असल्याने ना बहीण भावाकडे जाणार आहे. नाही भाऊ बहिणीकडे येणार असे चित्र आहे. गावालगत जवळपास किंवा जिल्हा अंतर्गत गावे असल्यास मोटारसायकलीने जाऊन रक्षाबंधन साजरी करण्याचा काहींचा विचार आहे. तर काहीजण जिल्ह्यांतर्गत असुनही कोरोनाच्या भीतीने जाणे टाळणार आहेत.
सोशियल मिडीयावरून शुभेच्छा 
अनेक बंधू-भगिनींनी प्रत्यक्ष भेटीपेक्षाही सोशल मिडियावरूनच आजपासूनच एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अनेकांनी मागील रक्षाबंधनाचे फोटो व्हॉटसप, फेसबुकवर प्रसिद्ध करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.तर काहींना मोबाईलवर संभाषण करून भाऊने बहिणीची राखी मिळाल्यासारखे असल्याचे सांगत आपल्या पवित्र नात्याचे दर्शन घडविले आहे.