भुसावळ (रिपोर्ट ) -
येथील माता रमाबाई आंबेडकर नगरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे कार्यक्रम समन्वयक योगेंद्रसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली,उत्तर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष प्रविणसिंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ शहर काँग्रेस अनु जाती विभागाद्वारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मार्गदर्शन केले. काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विजय तुरकेले, शहराध्यक्ष सुनिल जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार,काँग्रेस असंघटित कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष अॅड.शरद तायडे, शहराध्यक्ष अॅड.रमू पटेल,विक्रम वानखेडे,अनिल मोरे तसेच वार्डातील नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.