भुसावळ (रिपोर्ट ) -
दूधाचा शासकीय भाव वाढवून मिळावा या मागणीसाठी येथील राष्ट्रीय महामार्गावर भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी सरकारच्या विरोधाच्या घोषणा देऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे . या पार्श्वभूमीवर शनिवार १ ऑगष्ट रोजी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सकाळी भाजपतर्फे आंदोलन करण्यात आले.यावेळी राज्य सरकारच्या विरोधी घोषणा देण्यात येवून निषेध करण्यात आला . यावेळी आंदोलनात
रास्ता रोको करण्यात येवून दुध टँकर अडवून ठेवण्यात आले .
दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती. ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकटात शेतकरी बांधवांनी जीव धोक्यात घालुन जीवनावश्यक दुध उत्पादनाचे काम सुरु ठेवले अाहे,मात्र सद्यस्थितीत दुधाचे भाव राज्य सरकारने अतिशय कमी केले आहेत,उत्पादन खर्च सुध्दा निघत नाही आणि अशातच महाराष्ट्र शासनाने दुध उत्पादकांना मिळणारे अनुदान ही बंद केले आहे म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.परंतू राज्यातील सत्ताधारी आघाडी शासनाला दुध उत्पादक शेतकरी बांधवांच्या समस्या सोडवण्यास भाग पाडण्यासाठी
दि.१ आॅगस्ट शनिवार रोजी सकाळी ११ वाजता नाहटा कॉलेज चौफुली येथे भाजपा महायुती मित्रपक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले .
यावेळी आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, भाजप जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक प्रा. सुनील नेवे,महायुतीचे पप्पूभाऊ सुरळकर,भाजपा शहराध्यक्ष दिनेश नेमाडे,सरचिटणीस पवन बुंदेल,अमोल महाजन, नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे,किशोर पाटील,गिरीश महाजन,अजय नागराणी,सतीश सपकाळे,राजेन्द्र चौधरी, यांचेसह प्रा.प्रशांत पाटील,विशाल जंगले,राजु खरारे,नारायण रणधीर,माजी सभापती सुनील महाजन,संजय पाटील,माजी उपसभापती गोलु पाटील,ग्रामीण सरचिटणीस दिलीप कोळी,प्रमोद पाटील अर्जुन खरारे भाजप युवा मोर्चाचे अनिरुद्ध कुलकर्णी,चेतन बोरोले आणि महायुतीचे पदाधिकारी
नगरसेवक, कार्यकर्ते सहभागी
व महायुतीचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, शाखाध्यक्ष, नगरसेवक,आघाडी,मोर्चा पदाधिकारी,शक्ती केंद्रप्रमुख, बुथप्रमूख ,कार्यकर्ते बंधू मोठ्या संख्येने सोशल डिस्टंसिंगचे पालन करून व मास्क बांधून सामील झाले होते .