लोक न्यूज
अमळनेर:- शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेतली. या बैठकीत शेती पंप वीजपुरवठ्याच्या संदर्भात सविस्तर चर्चा करून महत्त्वाच्या सूचना केल्या.
*बैठकीतील प्रमुख मुद्दे:*
शेतकऱ्यांना पेरणी, रोप लावणी व पिकांच्या पाण्यासाठी नियमित व खंडमुक्त वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे. ही बाब लक्षात घेऊन आ. पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले की,
शेती पंपांना प्राधान्य द्या:, रोस्टिंग/लोडशेडिंगचा फटका शेती पंपांना बसू नये यासाठी स्वतंत्र फीडरद्वारे किंवा ठराविक वेळेत किमान 8 तास दर्जेदार वीजपुरवठा देण्यात यावा.वीज खंड टाळा- 220 KV व 33 KV उपकेंद्रांवरील तांत्रिक दुरुस्ती वेळेत पूर्ण करून ट्रिपिंग व खंडाचे प्रमाण कमी करावे.,तक्रार निवारण- शेतकऱ्यांच्या वीज तुटणे, कमी दाब अशा तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी स्थानिक पातळीवर यंत्रणा सक्षम करावी.
यावेळी आ. अनिल पाटील म्हणाले की, "शेतकरी हा देशाचा कणा आहे. पेरणीच्या काळात त्यांना वीजेची सर्वाधिक गरज असते. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे.महावितरण अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सूचनांची नोंद घेत लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.