वैजापूर, लोक न्यूज :
जागतिक रक्तदाता दिनानिमित्त वैजापूर येथील शालिवाहन पतसंस्था शाखेच्या वतीने 42 वेळा रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण करणारे रक्तदाता प्रशांत घाणेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी शालिवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष किशोरसिंह चौहान तसेच सामाजिक कार्यकर्ते ठाकूर धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते प्रशांत घाणेकर यांना गिफ्ट भेट देऊन शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. त्यांच्या निरंतर रक्तदानाच्या कार्याचे कौतुक करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याद्वारे अनेक रुग्णांना जीवनदान मिळते. प्रशांत घाणेकर यांनी आतापर्यंत 42 वेळा रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या कार्यातून युवकांनी प्रेरणा घेऊन रक्तदान चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
कार्यक्रमास पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत अधिकाधिक लोकांनी नियमित रक्तदान करावे, असा संदेश दिला.