लोक न्यूज
“ज्ञानाच्या मंदिरात आज आनंदाचा उत्सव रंगला, चिमुकल्यांच्या हास्याने शाळेचा प्रत्येक कोपरा उजळला. शिक्षणाच्या वाटेवर पहिले पाऊल जेव्हा पडले, उज्ज्वल भवितव्याची सुंदर स्वप्ने मनामध्ये रुजले.”
दि. १५ जून २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडळ (कन्या व बॉईज) येथे शाळा प्रवेशोत्सव २०२६ मोठ्या उत्साहात, आनंदी वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन व टाळ्यांच्या कडकडाटात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास मांडळ गावाचे सरपंच श्री. दिपक नंदवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दिपक कोळी तसेच उपाध्यक्ष श्री. विशाल सोनार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशांचे वाटप करण्यात आले. शाळेची आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फलक, फुगे आणि प्रसन्न वातावरणामुळे संपूर्ण परिसर आनंदमय व उत्सवी झाला होता. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. विकास पाटील सर यांनी केले. कन्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. जगदीश पाटील सर यांनी उपस्थितांचे स्वागत करून नवागत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच श्रीमती मीना पाटील मॅडम यांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मनापासून अध्ययन करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी श्रीमती अल्का पाटील मॅडम, श्रीमती मंगला पाटील मॅडम, श्रीमती नीलम चौधरी मॅडम, श्रीमती संगीता पाटील मॅडम तसेच श्री. राहुल सोनवणे सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकवृंद, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सहभागामुळे हा प्रवेशोत्सव संस्मरणीय ठरला.
🌹 संदेश 🌹
“आजची शाळेची पायरी, उद्याच्या यशाची शिडी ठरेल; ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवेल.”
शाळा प्रवेशोत्सव २०२६ यशस्वीरीत्या संपन्न झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि नवागत विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा!
🏫 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मांडळ (कन्या व बॉईज)
🌟 शाळा प्रवेशोत्सव २०२६ 🌟