लोक न्यूज
अमळनेर : तालुक्यातील आर्डी येथून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना ९ रोजी मध्यरात्री साडे बारा वाजता घडली.
    आर्डी येथील एकाने फिर्याद दिली की  त्याची  १४ वर्षे ६ महिने वयाची मुलगी  आणि  १५ वर्षे ८ महिने वयाची भाची या  दोन्ही मुली ८ रोजी रात्री  शेजारी  त्याच्या काकांकडे झोपायला गेल्या होत्या. ९ रोजी मध्यरात्री त्या दोन्ही शौचास जाऊन येतो असे सांगून निघून गेल्या. बराच वेळ  झाला तरी त्या परतल्या नाहीत  म्हणून शेजारील महिलेने फिर्यादीला येऊन सांगितले की तुझी मुलगी आणि भाची कुठे तरी निघून गेल्या आहेत. शोधाशोध करूनही सापडल्या नाहीत म्हणून अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज बागुल करीत आहेत.