लोक न्यूज
महाराष्ट्रात वाढत्या प्रेमविवाहाच्या घटनांमुळे सामाजिक असंतुलन आणि कुटुंबांतील मतभेद वाढत असल्याचे कारण देत, ‘भारत जागृत मंच’ या संस्थेने राज्य सरकारकडे प्रेमविवाहासाठी पालकांची संमती अनिवार्य करणारा कायदा तातडीने लागू करण्याची मागणी केली आहे.
या संदर्भात संस्थेने शासनाला पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अल्पवयीन आणि प्रौढ युवक-युवतींमध्ये प्रेमसंबंधांमुळे देशभरात अनेक गंभीर गुन्हे, फसवणुकीच्या घटना आणि खूनाचे प्रकार वाढीस लागले आहेत. अशा विवाहांमुळे अनेक वेळा कुटुंबीयांवर मानसिक ताण येऊन आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचे संस्थेचे मत आहे.
मुख्य मागण्या :
१. विवाह नोंदणीच्या वेळी पालकांची संमतीपत्र अनिवार्य:
प्रेमविवाहाची नोंदणी करताना नोंदणी अधिकारी, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांनी दोन्ही पक्षांच्या पालकांचे लेखी संमतीपत्र घेणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक करावे.
२. पालकांना बेदखल करण्याचा अधिकार:
पालकांच्या संमतीशिवाय पळून जाऊन विवाह करणाऱ्या युवक-युवतींना त्यांच्या पालकांनी संपत्ती आणि कुटुंब नोंदीतून बेदखल करण्याचा अधिकार कायद्यात द्यावा.
३. प्रेमविवाह संस्था आणि मंदिरांवर नियंत्रण:
राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट, मंदिर संस्था आणि विवाह नोंदणी केंद्रांवर देखरेख ठेवून धर्मदाय आयुक्त कार्यालयामार्फत तपासणी करावी. संशयास्पद विवाह नोंदींवर तात्काळ कारवाई व्हावी.
संस्थेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करणाऱ्या युवक-युवतींच्या वागण्यामुळे समाजात पालकांची बदनामी होत असून, हिंदू संस्कृतीला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्रेमविवाहासाठी पालकांची संमती घेणे अत्यावश्यक ठरते.”
‘भारत जागृत मंच’ने हे निवेदन राज्य शासनाला पाठवून २१ दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली आहे. तसेच या मुद्यावर लोकसभा व विधानसभेत विधेयक मांडून मंजुरी मिळवावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
संस्थेच्या म्हणण्यानुसार, या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास पालकांचा सन्मान, सामाजिक शिस्त आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
अमळनेर येथे आज रोजी निवेदन मंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले यावेळी उपस्थित भारत जागृत मंचचे अध्यक्ष संतोष बाबुराव पाटील,तसेच
स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील दयाराम महाजन नवप्रवर्तनवादी सामाजिक कार्यकर्ते,संदीप युवराज पाटील
आई वडिल,पालक यांच्या संमती स्वाक्षरी