लोक न्यूज
अमळनेर, ता. ८ नोव्हेंबर
अमळनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या पारस गोल्ड या प्रतिष्ठानाने सजावटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याची चर्चा सध्या शहरात रंगली आहे. या अतिक्रमणामुळे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिक, ग्राहक आणि वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, दिवाळीच्या निमित्ताने पारस गोल्डवाल्यांनी दुकानासमोर आणि बाजूच्या फूटपाथवर सजावटीचे साहित्य, स्टँड, लाईटिंग व जाहिरात फलक लावले आहेत. त्यामुळे पादचारी मार्ग पूर्णपणे अडला असून महिलांना आणि वृद्धांना चालणे कठीण झाले आहे.
मात्र, आतापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाकडून अशा मनमानीला आशीर्वाद मिळत असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे.
एका व्यापाऱ्याने सांगितले, “आम्ही छोटे व्यापारी असल्याने आमच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, पण मोठे दुकानदार असल्यावर नियम वेगळे का?”
अन्यथा बाजारपेठेतील अशा प्रकारच्या अतिक्रमणाला चाप बसणार नाही.