लोक न्यूज
अमळनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित भव्य अल्पसंख्याक मेळाव्यात मुस्लिम समाज बांधवांना “विकासाभिमुख आमदार अनिल पाटील यांच्या पाठीशी भक्कम उभे राहा” असे आवाहन करण्यात आले.
या मेळाव्यात आमदार अनिल पाटील, आमदार सना मलिक, माजी आमदार जिशान सिद्दीकी, नजीब मुल्ला व ऍड. नाझेर काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वक्त्यांनी अमळनेरच्या विकासासाठी अनिल पाटील यांचे योगदान अधोरेखित करत, येणाऱ्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अनिलदादांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.