लोक न्यूज
अमळनेर:-नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर विकास आघाडीसाठी इच्छुक उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया काल दिनांक 8 रोजी आमदार अनिल भाईदास पाटील व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील व कोअर कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
एकूण 18 प्रभागात 36 जागांसाठी एकूण 129 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.अनेक प्रभागात इच्छुकांची संख्या अधिक असताना चुरस वाढली असल्याने सर्व उमेदवारांनी कोअर कमिटीला सर्वाधिकार देत कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य राहील त्या उमेदवाराचा आम्ही सर्व मिळून प्रचार करू अशी ग्वाही सर्वानी दिली.खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांच्या मुलाखती झाल्या.सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी उशिरापर्यंत मुलाखती सुरू होत्या.यावेळी अनेक माजी नगरसेवक व मातब्बर उमेदवारांनी आपल्याला आघाडी कडून उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली.
आज नगराध्यक्ष पदासाठी मुलाखती
लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी आघाडी कडून निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून त्यांच्या मुलाखती आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजेपासून आमदार अनिल पाटील यांच्या चोपडा रस्त्यावरील क्रेशर मशीनवर होणार आहेत.