लोक न्यूज
अमळनेर दिनांक 13.मागील आठवड्यात अमळनेर तालुक्यातील वासरे व कळमसरे या दोन गावात अतिवृष्टी झाल्यामुळे व अचानक पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतीचे नुकसान व घरांची पडझड झाली होती,घरात पाणी शिरले होते,अशावेळी बऱ्याच कुटुंबांना शाळेमध्ये वास्तव्य करावे लागले होते, यामध्ये घरातील धान्य भांडीकुंडी याचे बरेच नुकसान झाले होते, व पुरामुळे वाहून गेले होते, अशी परिस्थिती पाहता सेंटर फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अर्थात कार्ड जालना आणि साने गुरुजी फाउंडेशन,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने वासरे व कळमसरे या दोन गावात पूरग्रस्त  कुटुंबांना यांना शेल्टर कम हायजीन किट्स वाटप करण्यात आले,या किट मध्ये लहान व मोठी ताडपत्री,मच्छरदाणी, अंगाची कपडे धुण्याची साबण,टूथपेस्ट,टूथब्रश,बॅग दोरी दहा प्रकारचे आहे, यावेळी साने गुरुजी फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील,कळमसरे येथील उपसरपंच जितेंद्र राजपूत तलाठी भूषण पाटील, मुकेश देसले,वासरे येथील रोहिदास पाटील, दिनेश पाटील,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते,यासाठी साने गुरुजी फाउंडेशनचे कार्यकर्ते शरद पाटील,संदीप धाकड,सचिन मोरे यांनी सहकार्य केले.