लोक न्यूज
अमळनेर – आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १३(ब) मध्ये प्रचाराचे तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रभागातून उमेदवारीची तयारी करणारे श्री. प्रविण बारकू महाजन यांनी आपल्या प्रचार मोहिमेला जोमदार सुरुवात केली आहे. “आपला हक्काचा माणूस” या घोषवाक्याखाली त्यांनी स्थानिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा ध्यास घेतला आहे.
महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रचार पोस्टरमध्ये “एकजुटीने, एकहाती लिहूया परिवर्तनाची नवी व्याख्या” असा संदेश देत, एकता आणि विकासाच्या माध्यमातून प्रभागाचा चेहरा बदलण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. स्थानिक समस्या – रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता व मूलभूत सुविधा – या प्रश्नांवर ठोस उपाययोजना राबवण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
या मोहिमेला स्थानिक नागरिक, युवकवर्ग आणि सामाजिक संस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अनेक कार्यकर्ते प्रचारात सक्रियपणे सहभागी होत असून, घराघरात जनसंपर्क अभियान सुरू आहे.
वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने श्री. प्रविण बारकू महाजन हे प्रभाग १३(ब) मध्ये मजबूत उमेदवार म्हणून पुढे येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.