लोक न्यूज
अमळनेर : नो पार्किंग मध्ये वाहने, रस्त्यावर वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ३३ जणांवर पोलिसांनी कारवाई करत २३ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे.
    अमळनेर शहरात धुळे रस्त्यावर आय डी एफ सी बँकेच्या समोर नेहमीच अवैध पार्किंग ने रस्ता गिळंकृत केलेला असतो, त्याच प्रमाणे बहुगुणे हॉस्पिटल बाहेर , बसस्थानक , पाचपावली मंदिराजवळ नागरिक रस्त्यावर  अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतुकीची कोंडी करत होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक पोलिस विलास बागुल , संजय  बोरसे , रवींद्र बोरसे , विनय पाटील यांना कारवाईचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी आज अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने , जादा प्रवासी भरून नेणारी वाहने  यांच्यावर कारवाया केल्या. तसेच धुळे रस्त्यावर पाचपावली देवी मंदिर ते आयडीएफसी बँकेपर्यंत रस्ता अडवणाऱ्या वाहनांना दंड तसेच नाकाबंदीत सीट बेल्ट ना लावणाऱ्या चालकांवर देखील कारवाई केली. एकूण ३३ कारवायामध्ये २३ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला. 
     
अमळनेर धुळे रस्त्यावर बस स्थानका पासून थेट आर के नगर पर्यंत तर बस स्थानक पासून थेट दगडी दरवाजा पर्यंत ठीक ठिकाणी अवैध पार्किंग ने रस्ता अक्षरशः गिळला आहे, मात्र पालिका आणि वाहतूक पोलीसांचे दुर्लक्ष होत होते.  वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी नियमित  कारवाईचा धडाका सुरूच ठेवावा अशी मागणी होत आहे.