लोक न्यूज
स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA) , भारत सरकार यांनी *सेवा पंधरवडा* अंतर्गत *स्वच्छोस्तव- स्वछता ही सेवा* अभियान २०२५ व भारताचे मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आज *दिनांक १८/०९/२०२५ रोजी सकाळी १०.० ते ४.० दरम्यान ग्रामीण रुग्णालय, अमळनेर मार्फत आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीरात* नगर परिषदेतील NULM चे बचत गटातील महिला, स्वच्छता विभागातील सर्व सफाई कर्मचारी व मुकादम, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी ई. यांनी सदर आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
तसेच अमळनेर येथे *"सेवा पंधरवडा"अंतर्गत आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर'* सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले होते. सदर समाधान शिबिरात खासदार, जळगांव लोकसभा, श्रीम. स्मिताताई वाघ व मुख्यांयाधिकारी तुषार नेरकर याच्या हस्ते प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत ५ लाभार्थी यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराची चावी देवून घरकुलाचे वाटप तर प्रधान मंत्री आवास योजना २.० अंतर्गत ५ घरांना प्रातिनिधिक स्वरूपात बांधकाम परवानगी व ३ महिला बचत गटांना दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत १९ लक्ष रुपयाचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना प्रधानमंत्री सूर्य घर योजनेची माहिती देण्यात आली.
दुपारी २.० वाजता धुळे रोड परिसरातील रवी नगर येथील ओपन स्पेस व साने गुरुजी उड्डाण पूल येथे *एकूण ७५ झाडांचे वृक्षारोपण* खासदार, श्रीम. स्मिताताई वाघ , भैरवीताई पलांडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व अनिल शिंदे यांच्या हस्ते पार पडले.
तदनंतर *अमळनेर बस स्थानक परिसरात संपूर्ण स्वच्छता अभियान* राबवून बस स्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला. दरम्यान खासदार श्रीम. स्मिताताई वाघ भैरवीताई पलांडे, मुख्याधिकारी तुषार नेरकर व डॉ. अनिल शिंदे यांनी स्वतः परिसरात झाडू घेवून व परिसर स्वच्छ करून अभियानात योगदान दिले. सदर प्रसंगी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, अभियंता सुनील पाटील, पाणीपुरवठा अभियंता प्रवीण बैसाणे, स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक तसेच नगर परिषदेतील बांधकाम , कर, आस्थापना, वसुली, लेखा ई. सर्व विभाग प्रमुख व सबंधित कर्मचारी, १ ते १७ प्रभागातील सर्व प्रभाग मुकादम , सफाई कर्मचारी तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते, महिला हौसिंग ट्रस्ट अमळनेरचे महिला पदाधिकारी व महिला सखी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव व वन परिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण अमळनेर चे पदाधिकारी, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक गणेश गढरी, युनुस शेख, अनंत संदानशिव, श्याम करंदीकर व परिसरातील नागरिक, विद्यार्थी ई. मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर अभियान कार्यक्रम अमळनेर नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आले. स्वच्छता हि सेवा अभियान दिनांक १७ सप्टेबर २०२५ ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राबविले जाणार असून अमळनेर शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, शासकीय -निमशासकीय कार्यालय, शाळा, खाजगी/सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, मा. नगरसेवक, पत्रकार संघ, ई. सर्वांनी सदर अभियानाची प्रभावीपणे अमलबजावणी करणे कामी अभियानात स्वयस्फुर्तीने सहभागी होवून अमळनेर शहर स्वच्ह, सुंदर व हरित करण्यात आपला अमूल्य सहभाग नोंदविण्याचे आवाहन खासदार, श्रीम. स्मिताताई वाघ , नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी तुषार नेरकर व डॉ. अनिल शिंदे यांनी केले आहे.