लोक न्यूज-
अमळनेर : डी वाय एस पी व अमळनेर पोलीस स्टेशनच्या दोन्ही पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून सट्टा जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे.
       डी वाय एस पी राकेश जाधव , एपीआय राकेशसिंग परदेशी , पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ , पोलीस उपनिरीक्षक गंभीर शिंदे , सुनील पाटील ,योगेश महाजन , मेघराज महाजन , संजय बोरसे , गणेश पाटील ,रोहिदास आगोने , हितेश बेहरे यांनी शहरातील झामी चौकात छापा टाकून अरमान कमालशहा फकीर , दगडी दरवाज्याजवळ रमेश फकिरा अहिरे , तर कसाली मोहल्ल्यात गोकुळ विठ्ठल सनासे याना कल्याण मटका नावाचा सट्टा जुगार खेळताना रंगेहात पकडून त्यांच्याजवळील रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.