अमळनेर : लोक न्यूज
 उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ला मोटरसायकलची धडक लागल्याने एक जण गंभीर झाल्याची घटना अमळनेर टाकरखेडा  रस्त्यावर संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
     अशोक आना पाटील रा निसर्डी हे आपल्या पत्नीसह  जळगाव ला सून प्रसूती झाली म्हणून बघायला गेलं होते. जळगावहून परत येताना चांदणी कुर्हे जवळील रेल्वे गेट ओलांडून अमळनेर कडे येताना खेडी कढोली येथील सिमेंट ने भरलेल्या उभ्या ट्रॅक्टरला त्यांच्या मोटरसायकलची धडक लागून त्यांच्या डोक्याला मार लागला. प्रवाश्यानी त्यांना रुग्णवाहिकेतून डॉ अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.