लोक न्यूज -
अमळनेर : कर्नाटकातील शिमोगा येथील हर्षा नामक व्यक्तीच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ बजरंग दल व विहिप तर्फे तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया , कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया , सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांनी पेरलेल्या विषाचे परिणाम म्हणजे ही हत्या आहे. भारतात घडलेल्या १९४६ च्या डायरेक्ट ऍक्शन चळवळीशी साधर्म्य असलेल्या मानसिकतेवर कठोर कारवाई करावी , या संघटनाना बंदी घालावी , अन्यथा विश्व हिंदू परिषद कायद्याने व सनदशीर मार्गाने उत्तर देईल असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला. माजी आमदार स्मिता वाघ , भैरवी पलांडे , नीरज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विहिप चे जिल्हा समरसता प्रमुख सुरेश पवार , तालुकाध्यक्ष संजय विसपुते ,शहराध्यक्ष ऍड आप्पा उपासनी , सचिन चौधरी , मनोज मराठे ,किरण बोरसे , रमाकांत बोरसे ,अक्षय कासार ,पवन बारी ,अर्जुन पारधी , भीमराव पवार , अनिल बडगुजर ,निखिल वाघ ,प्रसाद साळी ,हर्षल ठाकूर , गणेश पाटील , यश पाटील,मयूर चौधरी , परेश जोशी ,रोहन कासार ,अमेय डेरे , प्रवीण डेरे ,मयूर पाटील , सुमित राजपूत ,अंकित ,राकेश पाटील ,गोपाळ पाटील , पंकज धनगर ,यश पाटील यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तहसीलदार व प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्यामार्फत राष्ट्रपतीना निवेदन देण्यात आले.