लोक न्यूज-
अमळनेर येथील मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनच्या वतीने त्रिपुरा येथे मुस्लिम अल्पसंख्यांक समाजावर होत असलेल्या अमानुष घटनेचा निषेधार्थ अमळनेर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती महोदय भारत सरकार यांना लेखी निवेदन देण्यात आले मुस्लिम युथ सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्रिपुरा येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाज व त्यांच्या धार्मिक स्थळांची तोडफोड व नाशधुस करून धार्मिक भावना दुखावण्यात आल्या व त्याच प्रमाणे मुस्लिम समाजाच्या घरांवर जाळपोळ व हल्ला ही करण्यात आले निष्पाप व गरीब लोकांची बळी गेले सदरचे कृत्य हे मानवतेला काळीमा फासणारी घटना असुन या घटनेच्या आम्ही प्रकट निषेध करतो व या निवेदनाद्वारे विनंती करीतो की ज्या अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाचे व त्यांची धार्मिक स्थळांची संरक्षण करण्यात यावी आणि त्रिपुरा घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व कडक कारवाई होवावी अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, अॅड रज्जाक शेख,कालीम शेख अॅड अशपाक शेख अॅड अमजद शेख मुस्तफा पलम्बर आबिद अली सैय्यद शराफत मिस्त्री आलिम मुजावर कमर अली शाह,हाशम मिस्त्री अखतर अली ,सह बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.