अमळनेर- लोक न्यूज

कोराना काळात राज्य परिवहन मंडळाच्या बससेवा विस्कळीत झाली होती.सद्यस्थितीत दिवाळी सण  व शाळा सुरू झाल्याने गलवाडे ,झाडी,मार्गे अमळनेर ते सोनगीर ,मारवड कळमसरे मार्गे शहापूर-तांदळी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी या आशयाचे निवेदन आगारप्रमुख यांना पंचायत समितीचे उपसभापती भिकेश पाटील ,भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील ,हर्षल सोनवणे, लोण येथील सरपंच कैलास पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी यांनी दिले असून  प्रवाशांची गैरसोय होऊ नये असेही यावेळी सांगण्यात आले.