लोक न्यूज-
अमळनेर नवरात्री काळात राबवलेल्या विविध स्पर्धेच्या माध्यमातून आधुनिक नवदुर्गा यांची निवड करण्यात आली होती.त्यांच्या सन्मान सोहळा धनदीप बहुउद्देशीय संस्था नाशिकच्या अध्यक्षा यमूताई अवकाळे व रेखा वाल्मिक मराठे ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला,. सन्माना सोबत निवृत्त शिक्षिका, आदर्श शिक्षिका, व विविध क्षेत्रात बहुआयामी कर्तृत्व करणाऱ्या महिला भगिनींचाही यावेळी सन्मान करून सत्कार करण्यात आले. उद्घघाटक प्रांताधिकारी साहेब सीमा अहिरे माजी आमदार स्मिता वाघ , व गजानन परिवाराचे अध्यक्ष एस एम पाटील, यांनी दीपप्रज्वलन करून केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष सीमा अहिरे प्रांताधिकारी यांचा सत्कार एस एम पाटील यांनी केला. महिलांनी निर्भीडपणे आपली जबाबदारी पार पाडावी. कुठलाही दबाव घेऊ नये असे उद्गार सीमा आहिरे यांनी मनोगतातुन व्यक्त केले तर महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटावा असे मा. आमदार स्मिता पाटील यांनी म्हटले. प्रास्ताविक आयोजक सौ. रेखा वाल्मिक मराठे यांनी तर सूत्रसंचालन सौ छाया अशोक इसे यांनी केले आभार प्रदर्शन रुपाली पाटील यांनी केले वैशाली देवरे, पुनम साळुंखे, विमल नथु सूर्यवंशी, हे परीक्षक म्हणून लाभले.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे नवरात्री क्वीन सौ नूतन पाटील,पर्यावरण स्नेही स्वाती देसले मॅडम,आकाश वाणी निवेदिका मीना सैंदाणे ,यु टूबर श्रद्धा पाटील व रंगोळीकार शीतल व नंदा पाटील सुनीता पाटील, अनिता बोरसे, दक्षता समिती देशमुख नगर महिला मंडळ ,व पद्मजा पाटील, समुह गीत गायन मंडळ, व गजानन मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील ,अशोक इसे, नेरपाटचे ईश्वर भाऊ,वाल्मीक मराठे,विठ्ठल पाटील,प्रा आर व्ही पाटील यांनी कार्यक्रम यशस्वीते करीता परिश्रम घेतले.विशेष सहकार्य माजी नगरसेवक विनोद कदम यांनी व ग.स.चे मुख्याध्यापक श्री राजू महाले सर व चेअरमन यांनी हाल उपलब्ध करून दिला व कार्यक्रम यशस्विते करिता सहकार्य केले