लोक न्यूज-
राज्यस्तरीय सभेत शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद या शिक्षक संघटनेच्या जळगांव जिल्हाध्यक्षपदी जि.प.प्रा.शा अंचळगाव, ता. भडगाव येथील शिक्षक गणेश भगवंतराव देशमुख यांचीतर सचिवपदी जि.प.प्रा.शाळा वडगांव ता पारोळा येथील श्री प्रविण दत्तात्रय सनेर यांची नियुक्ती करण्यात आली.. *शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रभाकर झोड, प्रदेश महासचिव मा. व्यंकटराव जाधव, राज्य कार्याध्यक्ष श्री धनंजय उजनकर तसेच "मराठा सेवा संघाचे" श्री मधुकर मेहकरे, श्री अर्जूनराव तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले*.
संघटनेची ध्येयधोरणे शिक्षकांपर्यंत पोहचविण्यासाठी व संघटना वाढीसाठी लवकरच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिक्षक परिषदेची कार्यकारिणी जाहिर करून विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय सचिव श्री प्रविण सनेर यांनी व्यक्त केला.
जिल्हा कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री.विकास पाटील आणि भडगावचे गटशिक्षणाधिकारी श्री. परदेशी, राष्ट्रीय शिक्षण परिषद नाशिक विभागीय अध्यक्ष श्री प्रेमचंद अहिरराव, केंद्रप्रमुख श्री आर. डी. पाटील, मुख्याध्यापक श्री गुणवंत पवार सर यांनी अभिनंदन केले. श्री साई गजानन मंडळाचे एस एम पाटील,विठ्ठल पाटील,प्रा आर व्ही पाटील, प्रेमचंद सैंदाने, एस ए साळुंखे,सोनवणे आप्पा,प्राचार्य डी ई पाटील, श्री अशोक इसे सर, गुणवंतराव पवार, ग स मा. संचालक वाल्मिक मराठे पाटील,शिरीष डहाळे सर,तलाठी मंडलाधिकारी पतपेढीचे उपाध्यक्ष श्री पी एस पाटील ,सौ सुवर्णा पाटील अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.तसेच प्रगती गटाचे रावसाहेब मांगो पाटील, श्री योगेश सनेर सर, पारोळा शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील यांनी निवडीचे अभिनंदन केले