अकोला- लोक न्यूज

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ११० फुट उंचीचा पुतळा आमच्या ताब्यात द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात केली आहे महाराष्ट्र सरकारने काही वर्षा अगोदर असा आदेश काढला होता की रस्त्यालगतचे मंदिर पुतळे हटविण्यात यावे त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने बऱ्याच ठिकाणी एक तर्फे अशी कारवाई केली आहे बरीच मंदिरे पुतळे हे अजूनही तसेच आहेत परंतु अकोला महानगरपालिकेने वाशिम बायपास रोड वरील एका सामाजिक कार्यकर्ते यांच्या आवारात असलेला एकशे दहा फूट उंचीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटविला व तो पुतळा आता कापशी तलावाच्या जवळ शौचालयाच्या जवळ ठेवलेला आहे त्यामुळे बौद्ध समाजाच्या भावना दुखावल्या जात असून पुतळ्याची विटंबना आहे महानगरपालिका प्रशासनाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शिर्ला येथील बुद्धभूमी किंवा खडकी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान येथे देण्यात यावा अन्यथा महानगरपालिका आयुक्त यांच्यावर ऍट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करू म्हणून लवकरात लवकर हा ११० फुट उंचीचा पुतळा आम्हच्या ताब्यात द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश सुरेशराव इंगळे यांनी केली आहे