अमळनेर-लोक न्यूज

आमदार रोहित पवार हे  ता.२२रोजी अमळनेर विधानसभा मतदार संघात येणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक घनःश्याम जयवंत पाटील यांनी केले आहे. आमदार रोहित पवार यांचा दौरा रद्द करण्यात यावा यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांना अमळनेर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकारी यांनी निवेदन दिले आहे.
           या निवेदनात असे म्हटले आहे की,
श्री. घनःश्याम पाटील हे सन २०१७ मधील एम्.पी. डीऐची कारवाई असलेला गुन्हेगार असुन त्यांच्यावर अवैध वाळु चोरी करणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे, जमाव बंदीचे उल्लंघन करणे, दंगल घडवणे, जातीवाचक व इतर १२ गुन्हे आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकी मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार पाडण्यासाठी विरोधात खुप मोठ्या प्रमाणात काम केले. आता राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार निवडल्यानंतर प्रदेशच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांना भेटून कमीशन वैगरे देऊन काम घेण्यासाठी निधी आणत आहे, व त्याकामांच्या भुमीपुजन व उद्घाटनासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार व नेते बोलवत आहे. काल आम्हाला माहित पडले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार श्री. रोहित पवार अमळनेर दौऱ्यावर त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी येत आहे.  या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विश्वासात घेतले गेले नाही व तसेच जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यालयाकडून कोणत्याच प्रकारचा आदेश नाही. उलट मोठे नेते येऊन एखाद्या गुंडाला खतपाणी घालण्याचे काम नेते येऊन करणार असतील तर अमळनेर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना शरमिने मान खाली घालावी लागेल. पक्षाच्या विरोधात बोलण्यासाठी विरोधकांना जागा निर्माण होईल. हा सर्व प्रकार टाळण्यासाठी आपल्या स्तरावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते श्री. रोहितदादा पवार यांचा दौरा आपल्या स्तरावरून रद्द करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील, शहर अध्यक्ष मुक्तार खाटीक, विधानसभा क्षेत्र प्रमुख भागवत पाटील , यांच्यासह सर्व तालुका पदाधिकारी यांनी रविंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.


सचिन पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ कार्यकत्यांनी तालुक्यातील स्थानिक कार्यकर्त्यांना  विश्वासात न घेता आ.रोहित पवारांचा दौरा....