अमळनेर(लोक न्यूज )
श्री.वर्णेश्वर महादेव मंदिरासाठी
लोकवर्गणीतून कंपाउंड भिंत बांधण्याची संकल्पना पूर्ण करण्याचे जिकरीचे काम विश्वस्त मंडळाने हाती घेतले हे निस्वार्थ काम वाखानण्याजोगे आहे.असे गौरवोद्वगार आमदार अनिल पाटील यांनी वर्णेश्वर महादेव मंदिराच्या कंपाउंड भिंतीच्या बांधकाम भूमिपूजन प्रसंगी काढले.       
                 आमदारकीच्या फॉर्म भरण्याचे अगोदर वर्णेश्वर महादेवाची आराधना केली व महादेव यांनी मला यश दिले.असे जागृत देवस्थान असल्याने मंदिराचा विकास करण्याचे भाग्य मला लाभत असल्याने मी भाग्यवान आहे! मंदिरासाठी रोड व भक्त निवास साठी विशेष प्रयत्न करू तर कंपाउंड वॉल साठी सुद्धा माझे योगदान राहील असे प्रतिपादन यावेळी आमदार अनिल दादा यांनी केले.                          
            प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष सुभाष चौधरी यांनी संस्थाही क वर्ग तीर्थक्षेत्र असून तीर्थक्षेत्र विकास मार्फत विकास करावा ही विनंती केली. एक जागृत देवस्थान आहे अतिप्राचीन आहे येथे त्र्यंबकेश्वर या धरती प्रमाणे अनेक पूजा होत असतात व त्यांची कार्य सिद्धि सुद्धा होत राहते असे अनेक शिवभक्त आम्हास सांगतात देणगीची सुरुवात आम्ही आमच्या घरापासून व नातेवाईक यापासून केली अशी माहिती सुभाष चौधरी यांनी दिली.                               
                भूमिपूजन प्रसंगी देणगीदार स्वर्गीय पंडित राव सदाशिव चौधरी यांचे स्मरणार्थ श्रीमती कमलबाई पंडित चौधरी यांनी ६१ हजार भरीव देणगी रोख स्वरूपात दिली त्यांचा सत्कार आमदार अनिल दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.उपस्थित अनेक देणगीदारांनी यावेळी देणग्या दिल्या त्यांचाही सत्कार करण्यात आला.                       
        याप्रसंगी प्रताप साळी, रोटरी उपाध्यक्ष महेश पाटील,ऍड. तिलोत्तमा पाटील, सेवानिवृत्त पी आय हिरामण कंखरे, हेमत भांडारकर,रवी पाटील,प्रशांत भदाणे,पक्षीमित्र सुनील भोई,अजय पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विजू मास्तर ,निंबा बापू, संजय पूनाजी पाटिल, गोकुळ बागूल, उद्योजक सुरेश नारायण पाटिल,ए एसआय अनिल भोई, जगदीश चौधरी,सुरेश आत्माराम, ह.भ.प. इंजिनीयर गिरीश पाटील, एस एम पाटील, खा शि मंडळ संचालक हरी भिका वाणी, श्रीमती कमलबाई चौधरी, सौ उषाबाई चौधरी, बी. डी. ओ. चौधरी,यांचेसह  शेकडो शिवभक्त उपस्थित होते.                             
             कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय शुक्ल, भैय्या चौधरी,चंद्रशेखर भावसार , शिवाजी चौधरी, धर्मा सैनानी,अमोल चौधरी नाना पाटील, जगन पाटील, नारायण बडगुजर,सुशिल भोईटे, विशाल चौधरी,सुका भाऊ इत्यादींनी परिश्रम घेतले.                  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आत्माराम सर यांनी केले आभार प्रदर्शन ह.भ.प. इंजिनीयर गिरीश पाटील यांनी केले.