लोक न्यूज-
अमळनेर : मोकाट जनावरांबाबत  पालिकेने ठोस कारवाई सुरू केल्याने गेल्या तीन दिवसात डुकरे मालकांनी साडे चारशे डुकरे शहराबाहेर हलवली आहेत.
      गेल्या काही दिवसांपासून मोकाट डुकरांचा खूप त्रास होत होत होता. घरात घुसून अन्न धान्य यांची नासाडी , चिखलात भरल्याने दुर्गंधी व आरोग्यावर परिणाम होत होता. म्हणून नागरिकांनी ओरड केली होती. याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी दखल घेत डुकरे मालकांना नोटिसा देऊन त्यांच्या डुकरांना हलवण्याचे निर्देश देऊन कारवाईचा इशारा दिला होता. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड , आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण , संतोष बिऱ्हाडे , अरविंद कदम हे दररोज डुकरे मालकांकडून किती डुकरे केव्हा रवाना केली याचा पुराव्यासह पाठपुरावा घेत आहेत. डुकरे मालक विक्रम जाधव , राजेश जाधव , ठाकूर फथ्रोड यांनी पिंपळे रोड , ढेकू रोड , आदर्श नगर , एल आय सी कॉलनी , शंकर नगर , देशमुख नगर ,आर के नगर  पैलाड , ताडेपुरा ,झामी चौक ,बालाजी पुरा , शिरूड नाका , बहादरपूर रोड  आदी भागातील सुमारे साडे चारशे डुकरे  उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे , आरोग्य सभापती श्याम पाटील , नगरसेवक प्रताप शिंपी ,नगरसेवक विवेक पाटील यांच्या साक्षीने  शहराबाहेर हलवली आहेत.