लोक न्यूज-
 दिनांक  १९/७/२०२१ रोजी शिव संपर्क अभियान अंतर्गत  ढेकु सारबेट हेडावे पळासदडे या चार गावांमध्ये शाखा उद्घाटन व सभासद नोंदणी अभियान अंतर्गत कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमाला सहसंपर्कप्रमुख जळगाव जिल्हा माननीय गुलाबराव जी वाघ व जिल्हाप्रमुख माननीय विष्णू भाऊ  भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला तालुका प्रमुख शिवसेना विजय मास्तर उपतालुकाप्रमुख शिवकुमार पाटील माजी उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख संजय पवार सरपंच नाना वाघ उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी ना. गुलाबराव  वाघ  यांनी आपल्या भाषणात सांगितले की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे  यांनी जनतेचे प्रश्न मार्गी लावले आहेत आणि अजून काही लोकांच्या समस्या असतील त्या समस्या घेऊन आम्ही उद्धव साहेबांना सांगणार आहोत या संपर्क अभियानांतर्गत जनतेशी संवाद साधून जनतेच्या अडीअडचणी समजून घ्या व कोरोनाचे नियम पाळून शिवसैनिकांना जनतेची सेवा करावी असा आदेश उद्धव साहेब यांनी आम्हाला देऊन जनतेपर्यंत पाठवले आहे तसेच जिल्हा प्रमुख विष्णू भाऊ बंगाळे यांनीसुद्धा त्यांच्या भाषणात सांगितले की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री जनतेचे चांगले निर्णय घेतले आहेत त्यात शेतकरी  कर्जमाफी असो शेतकऱ्यांसाठी तसेच जनतेसाठी मोफत धान्य योजना दोन महिन्याच्या रेशन जनतेला मिळाले किंवा नाही तसेच रिक्षा परवानाधारक यांना पैसे मिळाले का याची चौकशी करण्यासाठी गावागावात जाऊन जनतेचे संवाद साधा असा आदेश तालुकाप्रमुखांवर शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे जनतेचे प्रश्न असतील ती आपले शिवसैनिक मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे तसेच गांव तेथे शिवसेना व घर तेथे शिवसैनिक ही संकल्पना आपन राबवनारआहोत आसे सांगितले आहे