अमळनेर- लोक न्यूज
राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने २५ जुलै २०२१ रविवार रोजी सकाळी १० ते दुपारी ३ च्या दरम्यान ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यात रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून पुढील उपचारासाठी शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. तरी मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार अनिल भाईदास पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम येणार असून यात
डॉ. निलेश चांडक(कॅन्सर तज्ञ),
डॉ. श्रध्दा चांडक(कॅन्सर तज्ञ),
डॉ. भूषण पाटील(स्त्री रोग तज्ञ),
डॉ. यू.बी. ताडखेडकर(नेत्र शल्यचिकित्सक तज्ञ),
डॉ. प्रविण पाटील(नेत्र शल्यचिकित्सक तज्ञ),
डॉ. कुरकुरे(अस्थीरोग तज्ञ),
डॉ. सचिन अहिरे(अस्थीरोग तज्ञ),
डॉ. संदिप जोशी(हृदयरोग तज्ञ),
डॉ. विक्रांत पाटील(हृदरोग्य तज्ञ),
डॉ. बान्सी(त्वचारोग तज्ञ),
डॉ. जी. एम. पाटील(बालरोग तज्ञ),
डॉ. आशिष पाटील(बालरोग तज्ञ),
डॉ. शरद पाटील(जनरल सर्जन),
डॉ. प्रियंका पाटील(क्ष-किरण तज्ञ),
डॉ.सुमित पाटील(दंत शल्य चिकित्सक), तसेच
आयुष विभागातील
डॉ.परेश पवार,
डॉ.शिरीन बागवान,
डॉ.तनुश्री फडके,
डॉ.गणेश पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे.