लोक न्यूज-
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे तिघांनी घरात घुसून पत्नी मुलांना मारहाण करून अश्लील शिवीगाळ करून अपमानित केल्याने एकाने आत्महत्या केली आहे. तिघांविरुद्ध मारवड पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१४ रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान अशोक लखा कोळी , , सागर अशोक कोळी व पंकज संजय कोळी या तिघांनी भाऊसाहेब प्रकाश कोळी याच्या घरात घुसून त्यांना मारहाण करीत होते त्यांच्या पत्नी सुनीता हिने आरोळ्या मारल्याने तिघे घरातून पळून गेले. त्यावेळी भाऊसाहेब हा मी स्वतःच्या जीवाचे काहीही करून घेईल असे सांगत होता. दुसऱ्या दिवशी १५ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भाऊसाहेब याने नदी काठावरील गाव विहिरीजवळ विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना हिरे मेडिकल कॉलेज धुळे येथे उपचारसाठी दाखल केले. उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला डॉ सिद्धार्थ कांबळे यांनी त्यांना मयत घोषित केले. सुनीता हिच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध मारवड पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास एपीआय राहुल फुला ,प्रकाश साळुंखे विशाल चव्हाण करीत आहेत.