लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील जवखेडा येथे सार्वजनिक जागेवर असलेला हातपंप 25 ते 30 वर्षापासू सदर जागेवरती होता. भिल्ल वस्तीची पाण्याची सोय होत होती परंतु छोटू गुलचंद अहिरे यांनी दि. 22/7/2021 रोजी कुठलीही शासकीय परवानगी न घेता हातपंप तोडून मुरूमने बुजून टाकला छोटू अहिरे यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले असून या बाबत सदर इसमाची चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी. असे निवेदनाद्वारे अमळनेर पोलीस स्टेशन येथे मागणी केली आहे. सरपंच-लताबाई हिम्मतराव पाटील,उपसरपंच चुडामन पाटील,ग्रामसेवक दिलीप मोरे,ग्रा.प. सदस्य ऍड.दिनेश पाटील,प्रशांत पाटील,जिजाबराव भिल,माजी सभापती वजाबाई भिल,दिनकर पाटील,गोटू भाई पाटील,भूषण जैन उपस्थित होते.