लोक न्यूज-
अमळनेर नगरपरिषद यांच्या कडून सन २०१९-२० च्या वित्तीय वर्षातील दिव्यांग कल्याण निधी वाटपात हलगर्जीपणा केला असल्याचे स्पष्ट झाले असतांना या पूर्वी जिल्हाधिकारी अभिजित राऊत व जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश दिघे यांच्या कडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या होत्या परंतु माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर नगरपरिषद यांनी ज्ञापन देऊन निर्दोष कर्मचारी यांना या विषयात ढकलण्यात आले असल्याचे समोर आले आहे.पण ज्या अधिकारींच्या आदेशानुसार निधी वाटप करण्यात आला त्यांच्यावर कोणतीही कारवाई का..? करण्यात आली नाही असा प्रश्न दिव्यांगांन कडून विचारला जात आहे.

शासनाचे आदेश हे कागदावर असून देखील जिल्हा प्रशासन कारवाई न करता सदरील अधिकारी यांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येते. तथापि सदरील झालेला प्रकार प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश पवार व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी मा.ना.बच्चूभाऊ कडू यांच्या कडे पाठविण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यावर १० दिवसात कारवाई न झाल्यास संस्थापक अध्यक्ष ना.बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ ऑगस्ट २०२१ क्रांतिदिनी  जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे.