लोक न्यूज-
महाराष्ट्र राज्य ग्रा.पं. कर्मचारी युनियन4511चा अमळनेर तालुका मेळावा. आज पं.स. अमळनेर येथील साने गुरुजी सभागृहात संपन्न झाला. मेळाव्यात कर्मचाऱ्याच्यां किमान वेतन, प्रा. फंड, राहणीमान भत्ता, विमा लागु करणे व इतर समस्याबाबत चर्चा करण्यात आली तसेच संघटनेची अमळनेर तालुका नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्यात नरेंद्र पाटील गोवर्धन यांची तालुकाध्यक्ष पदी, श्री. रविन्द्र पाटील मंगरूळ यांची उपाध्यक्ष तर सुभाष पाटील मारवड यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली तसेच सरदार कोळी मुडी, सतिष पाटील शिरुड, सुकदेव पाटील सडावण, दिपक पाटील अमंळगाव, राजेंद्र वाणी पातोंडा, रविंद पाटील दहिवद, रावसाहेब पाटील एकलहरे, रविंद्र पाटील पिंपळे बु., प्रभाकर पाटील रामेश्वर, नरेंद्र पाटील गडखांब, दुर्योधन धोबी वावडे, महेंद्र भिल सात्री, नाना पाटील कंडारी यांची सदस्य निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. सतिष पाटील होते. तसेच कार्यक्रमाला पारोळा तालुकाध्यक्ष श्री. प्रभाकर पाटील, दिपक गिरासे बोळे, अनिल पाटील पं.स. कनिष्ठ लिपीक, के.डी.पाटील व तालुक्यातील कर्मचारी उपस्थित होते.