अमळनेर( लोक न्यूज ) "कर्तृत्व संपन्न गुरुवर्यानां सन्मान देण्याची स्व.प्रताप शेठजींनी घालून दिलेली परंपरा खान्देश शिक्षण मंडळाचे संस्थाचालक विसरले असून वेळीच अश्या प्रवृत्तीला अमळनेरच्या शैक्षणिक विश्वातून जागृत नागरिकांनी बाहेर घालवले पाहिजे!असा एक सामाईक सूर प्रताप महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती सुहास राणे यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने नागरी हित दक्षता समिती आयोजित नागरी सत्कार संमारंभात उपस्थित आजी माजी आमदारांसह मान्यवरांनी रोटरी हॉल येथे व्यक्त केला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते भव्य गौरव पत्र देऊन प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांच्या नागरी सत्कार करण्यात आला.
प्रथम महिला प्राचार्य डॉ ज्योती सुहास राणे यांनी गौरवशाली असे काम प्रताप महाविद्यालयात केलेले असूनही त्यांना राजीनामा द्यावा लागण्याची किंवा स्वेच्छा निवृत्ती घेण्याची वेळ ज्यांच्यामुळे आली अश्यावृत्तीची दखल समाज घेतल्याशिवाय राहणार नाही! असे मत अध्यक्षीय भाषणात आ.अनिल पाटील यांनी व्यक्त केले. तर मा.आ.डॉ.बी एस पाटील यांनी डॉ ज्योती राणे या प्रताप महाविद्यालयाच्या इतिहासातील एक सुवर्ण कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ठ कर्तृत्वसंपन्न आदर्श प्रशासक होत्या! संस्थाचालकांच्या शाबासकीपेक्षा डॉ.ज्योती राणेंचा समाजाने केलेला गौरव लाखपट मोठा आहे असे सांगितले. यावेळी मा.आ.स्मिताताई वाघ , महिला मंच च्या डॉ.अपर्णा मुठे,नागरी समितीचे संदिप घोरपडे ,बन्सीलाल भागवत यांनीही विद्यार्थी प्रिय डॉ.ज्योती राणे यांच्या भव्य कार्याचा आलेख मांडत प्रतापच्या बाहेरील समाजात कार्य करून महिला कर्तृत्वाच्या विरोधाला उत्तर देण्याची अपेक्षा व्यक्त केली.प्रास्ताविकात प्रा.अशोक पवार यांनी अमळनेर च्या थोर शैक्षणिक सांस्कृतिक परंपरेचे दाखले देत येथिल शैक्षणिक वातावरणात विकृती वाढू नये म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे.डॉ.राणें यांच्यासारख्या महिला कर्तृत्वाची समाजाने दखल घेणेच्या उद्देशाने नागरी सत्कार आयोजित केलेला असल्याचे सांगितले. प्रा.नितीन पाटील यांनी डॉ.ज्योती राणे यांच्या जीवन परिचय करून देताना त्या मातृहृदयी सौजन्यशील प्रेरणादायी निस्वार्थी निगर्वी अश्या शिक्षिका असल्याचे सांगत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात मार्गदर्शक ठरल्या असल्याचे सांगितले.उद्योगपती सुहास राणे यांनी डॉ ज्योती राणे यांनी उत्कृष्टपणे घर व कुटुंब सांभाळून नेत्रदीपक प्रगती केल्याचे सांगितले. प्रा.लिलाधर पाटील यांनी विविध दाखले देत उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. मंचावर मा.नगराध्यक्ष विनोद पाटील उपस्थित होते.यावेळी कृषी उत्पन बाजार समितीच्या प्रशासक सौ तिलोत्तमा पाटील, खा शि मंडळाचे मा.संचालक डॉ अनिल शिंदे,अमळनेर महिला मंच तर्फे महिला पदाधिकारी, पाडळसरे धरण जनआंदोलन संघर्ष समितीतर्फे सुभाष चौधरी, सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे,रोटरी क्लब तर्फे अभिजित भांडारकर, ग्राहक पंचायत तर्फे मकसूद बोहरी व सहकारी,विवेक देशमुख, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी मंगलसिंग सूर्यवंशी,खा शि मंडळाचे माजी संचालक प्रविण जैन,
पारोळा येथील माजी नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,कमल कोचर डॉ निखिल बहुगुणे प्रतिष्ठीतांसह विविध संस्थांचे शेकडो पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते ,खा शि मंडळाचे माजी पदाधिकारी, प्रताप महाविद्यालयाचे आजी माजी प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, न्यु प्लॉट परिसरातील रहिवासी व राणे कुटुंबातील सर्व सदस्य, यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत डॉ राणे यांचा सत्कारही केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मगन भाऊसाहेब पाटिल, संदिप जैन,ऍड.किरण पाटील, अमोल पाटील, सुनिल अहिरराव, यतीन पवार आदिंनी प्रयत्न केले.