लोक न्यूज-
गांधली या गावांमध्ये गुरुपौर्णीमेचे औचित्य साधून सामाजीक वनीकरण, ग्रामपंचायत, पाणी फाउंडेशन यांच्या प्रयत्नातून 17000 वृक्षांचे वृक्ष लागवड करण्याचा आज शुभारंभ "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे"* अमळनेर तालुक्यातील गांधली या गावांमध्ये सरपंच नरेंद्र पाटील, ग्रामसेवक नितीन साळुंखे, एम एस आर एल एम डी एम एम किरण महाजन, पोलीस पाटील, सामाजिक वनीकरणाच्या वनरक्षक अलका पाटील, पाणी फाऊंडेशन तालुका समन्वयक सुनील पाटील, भुषण ठाकरे तसेच गावातील अनिल पाटील, प्रवीण पाटील, अलका महाजन, मनोज श्री गणेश या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत गांधली गावच्या गावठाण जागेमध्ये सामाजिक वनीकरण विभाग अमळनेर ग्रामपंचायत गांधली व पाणी फाउंडेशन चे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून 4000 बांबू तसेच चिंच, सेलम,सिसू ,साग, बेल,निम यांची13000 वृक्षांची वृक्ष लागवड करण्याचे काम सामाजिक वनीकरणाच्या मजुरांच्या मार्फत टप्प्याटप्प्याने येत्या आठवड्यात भरामध्ये केली जाणार आहे येत्या काही वर्षांमध्ये गांधली गावांमध्ये खूप मोठे जंगल प्राणी पक्षी सर्प व इतर जीव जंतू व जैविक घटक यांची या जंगलामध्ये मोठा वावर होणार आहे भविष्यामध्ये खूप मोठे ऑक्सिजन पार्क करण्याची संकल्पना यातून साकारली जाणार आहे याच बरोबर पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून नाल्याच्या कडेला जल व मृद संधारण करण्यासाठी आणखी दोन हजार बांबू वृक्षांची लागवड केली जाणार आहे त्यासाठीही शासनस्तरावर ती पाठपुरावा सुरू आहे