लोक न्यूज-
अमळनेर : शेताच्या बांधावरील पायवाट का कोरली या कारणावरून तिघांनी वृद्ध शेतकऱ्याला काठीने मारहाण केल्याची घटना २२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास लोण बुद्रुक येथे घडली.
     दौलत शेना पाटील वय ७९ हे  आपल्या लोण बुद्रुक येथील शेत गट नंबर २१० मध्ये काम करीत असताना त्यांनी शेजारील खंडेराव चुडामन पाटील याना बोलले  की आपल्या शेताच्या बांधावरील लोकांच्या येण्या जाण्यासाठी असलेली पाय वाट का कोरली ? याचा राग येऊन खंडेराव पाटील , संदीप खंडेराव पाटील व गोटू बापूराव पाटील हे दौलत पाटील यांच्या शेतात येऊन अश्लील शिवीगाळ करू लागले आणि संदीपने हातातील काठीने पाठीवर , डाव्या हातावर मारहाण करून खाली जमिनीवर पाडले आणि गोटू पाटील याने चापटा बुक्क्यांनी मारहाण करून मारून टाकण्याची धमकी दिली. त्यावेळी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी भांडण आवरले . दौलत पाटील यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस स्टेशनला तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाययक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश साळुंखे करीत आहेत.