लोक न्यूज-
अमळनेर:येथील गलवाडे रोडवर पोलिसानी बेधडक कारवाई  करीत मॅक्स गाडीभर विमल गुटखा व व्ही वन तंबाखू चा माल पकडला आहे.पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.
 गुप्त माहितीच्या आधारे पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव व मारवाड पोलिस ठाण्याचे  सहायक पोलीस निरक्षक राहुल फुला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  उपनिरिक्षक  वैभव पेठकर ,पोलिस  नाईक निकम,पोलिस नाईक चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.पोलिसांनी गलवाडे रोड येथून एका मॅक्स गाडीतून  20 मोठ्या गोण्या एकूण 4 लाख 84000 व 60 लहान गोण्या 13 लाख 72 हजार 800 रु. असा एकूण 18 लाख 56 हजार 800 रु. किमतीचा विमल गुटखा व व्ही एन तंबाखू चा माल पकडला व  आरोपी शंकर पाटील(वय 58)रा.लक्ष्मी नगर,दोंडाईचा व गोविंद अमरलाल राजांनी,रा.शिंदखेडा, जि धुळे यांना ताब्यात घेतले आहे.
 याबाबत फिर्याद दिपक शिंदे(स्थानिक गुन्हा शाखा जळगाव)यांनी दिली असून पुढील पोलीस तपास सुरू आहे या पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.