भुसावळ (रिपोर्ट )-
शेतकरी लोकांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या सोयीसाठी दिनांक – 14.08.2020 पासून “किसान रेल” पार्सल गाड़ी ही मुजफ्फरपुर पर्यंत करण्यात आली आहे . तसेच या गाड़ीच्या वेळा पत्रक मधे बदल करण्यात आला आहे . त्यामुळे शेतकरी , व्यापारी , बाजार समिती , लोडर्स यांना आपल्या सोयीनुसार जास्तीत जास्त प्रमाणात माल पाठविता येईल . गाड़ीच्या वेळ मधे बदल पुढीलप्रमाणे केला गेला आहे .
गाड़ी क्रमांक – 00107 डाउन देवळाली –ते मुजफ्फरपुर किसान पार्सल गाड़ी ही दर शुक्रवार देवळाली स्टेशन हुन 18.00वाजता प्रस्थान करुन रविवारी सकाळी 03.55 वाजता मुजफ्फरपुर स्टेशन ला पोहचेल .
थांबा --- नाशिक रोड 18.10/18.30, मनमाड-19.30/19.55, जळगाव-21.55/22.15, भुसावळ-22.45/23.15, शनिवारी बरहानपुर - 00.05/00.20, खंडवा -02.10/02.25 , इटारसी, पिपरिया, गाडरवारा, नरसिंगपुर,जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं.दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि दानापुर याठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक 00108 अप मुजफ्फरपुर ते देवळाली ही गाडी प्रत्येक रविवारी 09.45 वाजता प्रस्थान करून सोमवारी 19.45 वाजता देवळाली ला पोहोचल.
प्रवासा दरम्यान या गाडीला पुढील स्टेशनवर थांबा देण्यात आला - सोमवारी खंडवा 11.45 / 12.05 , बुऱ्हाणपूर - 13.25/13.45 , भुसावळ - 14.40/15.00 , जळगांव - 15.30/15.50, मनमाड - 17.50/18.10 , नासिक - 19.15/19.35 येथे थांबेल.
सदर शेतकरी लोकाना त्यांचा माल बुक करण्यासाठी त्याना माल पॅक करून हा आपल्या जवळ पासच्या पार्सल ऑफिस मध्ये आणावा लागेल . सोबत आधार कार्ड ची झेरॉक्स ठेवावी लागेल . शेतकरी ,कार्गो एग्री ग्रेटर , व्यापारी ,बाजार समिती , आणि लोडर्स , याना आपल्या जवळपासच्या स्टेशन मुख्य पार्सल पर्यवेक्षक यांच्या कड़े संपर्क करावा लागेल .
या रेल्वेला उत्तम प्रतिसाद मिळून शेतकर्यांना मोठी मदत होईल अशी अपेक्षा आहे.. रेल प्रशासन शेतकऱ्यांना आवाहन करते की जास्तीत जास्त या गाडीचा उपयोग घ्यावा .

