रिपोर्ट -संजय कोळी 
 दि.14/8/2020 धुळ्याजवळील हरण्यामाळ छोटेसे गाव नकाणे तलाव, हिरव्यागार वनश्री ने नटलेले निसर्ग रम्य छोटेसे आदिवासी वस्ती असलेले गाव . शहरापासून जवळ असूनही अगदी च अलिप्त येथील आदिवासी बांधव शेतमजूर,शेळ्यामेंढ्या, कोंबडी पाळून उदरनिर्वाह करणारे....
काही दिवसांपूर्वी करोना चे पेशंट आढळले ले करोना गावाच्या यादीतही हरण्यामाळ चे नाव दिसले खुप चिंता वाटली.उद्याच्या15आँगस्टच्या स्वातंत्रदिनाच्या पुर्वसंध्येला या गावात आदीवासी बांधवांसाठी दारूबंदी आणि करोना संकटकाळात जनजागृती करावी असे मनाशी आज ठरविले. आणि युवा कार्यकर्ता चेतन उपाध्याय याला घेऊन दुचाकीवरून हरण्यामाळ येथे आज पोहोचलो. 
महीला जमल्यावर आदीवासी समाजाचा विकास होण्यासाठी व्यसनमुक्ती ही काळाची गरज असून मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नका.असे जनजागृती च्या माध्यमातून पटवून दिले.तसेच करोना संकट काळात कशी खबरदारी घ्यावी, वारंवार हात साबणाने धुवावेत.असेही विनंती करून समजावून सांगितले.तत्पुर्वी एका आदीवासी महीलेच्या घरी चुलीवर  तुळसी ची पाने,अद्रक ,गुळ , तसेच दालचिनी, लवंग, मिरी,जिरे,हळद, वेलदोडे,गुळवेल, जेष्ठमध,यांची भुकटी टाकून पातेल्यात पाणी उकळायला ठेवले आणि त्याना घरगुती काढा कसा बनवायचा याचेही प्रात्यक्षिक दाखवून दिले.
नंतर सर्वांना काढा वाटप केला...
सर्व आदीवासी भगीनींनी या उपक्रमाचे खुप कौतुक केले....
व त्याबरोबर त्यांच्या अनेक समस्यांविषयी माझ्या कडे मनमोकळेपणाने तळमळीने सांगितले... तेव्हा मी माझा फोन नंबर देऊन तुम्हाला काही अडचण आली तर सांगा असे सांगून निघाले....
चेतन ने या उपक्रमासाठी खुप मोलाचं सहकार्य केले...
येथे आदीवासी बांधवांची मन परीवर्तन करायला नक्की खुप वेळ लागणार कारण येथील बरेचसे जण दारू पिणारे व दारू विक्री चा ही व्यवसाय करणारे आहेत...
आज पुन्हा एकदा हरण्यामाळ गावात दारूबंदी ची चळवळ जाऊन पोहचली... याबद्दल खूप समाधान वाटले...

......✍️सौ गीतांजली कोळी
संपूर्ण महाराष्ट्र दारूबंदी महीला/ युवा मोर्चा धुळे