सोनगीर(रिपोर्ट)
कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमी वर नियमांचे काटेकोरपणे पालन करून जि.प.शाळा निकुंभे येथील उपक्रशील शिक्षिका श्रीम. जयश्री वसंतराव बोरसे यांनी ज्या विद्यार्थ्यांकडे whatsaap mobile, व साधा मोबाईल देखील नाही.त्यांच्याकडे कुठल्याच प्रकारची सुविधा नसल्याने अशा होतकरू, गरीब विद्यार्थी अभ्यासापासून वंचित राहू नयेत...म्हणून जयश्री बोरसे यांनी स्वतः अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाचा घटक, प्रत्येक विषयाचे मुद्दे झेराॅक्स करून सामाजिक अंतर राखून घरपोच केले..व प्रत्येक विषयाचा अभ्यास समजावून दिला...हा उपक्रम राबवितांना मुख्याध्यापक अशोक सिताराम पाटील यांचे सहकार्य लाभले..

