अमळनेर(रिपोर्ट)
मुंदडा फाउंडेशन संचलित श्री एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेर येथे 74 वा भारतीय स्वातंत्र्य दिन Covid 19 च्या नियमाचे पालन करीत अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे प्राचार्य श्री लक्ष्मण सर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सदर वेळी शाळेच्या प्रायमरी प्राचार्या सौ विद्या लक्ष्मण, प्री प्रायमरी को ऑडीनेटर सौ योजना ठक्कर, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
74 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्री ओमप्रकाश मुंदडा, चेअरपर्सन सौ छायाभाभी मुंदडा, सचिव श्री अमेय मुंदडा, सहसचिव श्री योगेश मुंदडा, श्री नरेंद्र मुंदडा, श्री राकेश मुंदडा, श्री पंकज मुंदडा, ऍडमिनिस्ट्रेटर सौ दीपिका मुंदडा यांनी शुभेच्छा दिल्या.

