अमळनेर (रिपोर्ट)
सध्या संपूर्ण देशात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजलेला आहे. यासाठी शासन व प्रशासनाच्या नियमाचे पालन करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे सध्या गणेशोत्सव सण जवळ आला आहे तरी गणपती मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करून सहकार्य करावे गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करा व सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व न देता आरोग्यविषयक जनजागृती करा.जेनेकरून त्यातून प्रबोधन होईल असे अमळनेर येथे जी.एस.हायस्कूलच्या सभागृहात अमळनेर गणपती मंडळ यांच्या सहविचार सभेत उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल अध्यक्षीय भाषणातून बोलत होते.
व्यासपीठावर पोलिस निरीक्षक अंबादास मोरे होते.
उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल पुढे म्हणाले की गणपती उत्सव साजरा करतांना जाहिराती न करता आरोग्याच्या जनजागृतीवर भर द्यावा. पर्यावरण पूरक मुर्ती असावी,गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी नपाची परवानगी घ्यावी. कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने आपण शासन प्रशासनाला सहकार्य करावे. असे सांगितले.
पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी सांगितले की उत्सवातील नियमांचे पालन करावे .144 जमाव बंदी आदेश कायम आहे.गणपतीची चार फूटापेक्षा मोठी मूर्ती नसावी.सजावटीचा खर्च कमी करून आरोग्य विषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करावे. मास्क व सँनीटायझरचा वापर मंडळातील सदस्यांनी करावा.कंटेनमेंट झोनमध्ये गणपती उत्सवाला मनाई आहे. एक गाव एक गणपती हि संकल्पना राबविण्यात यावी.प्रत्येक प्रभागात एकच गणपती बसवावा. खर्चाला फाटा देत कोव्हिड सेंटरला मदतीसाठी सहकार्य करावे असे सांगितले.
यावेळी मंगलमूर्ती गणेश उत्सव मंडळाच्या वतीने कोव्हिड सेंटरमधील रूग्णांना एक दिवसाचा जेवन आम्ही देऊ असे बापू वाणी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शरद पाटील यांनी केले. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, व गणेशप्रेमी नागरीक,पत्रकार उपस्थित होते.

