चोपडा रिपोर्ट - मानव सेवा तीर्थ येथील ७४ व्या स्वातंत्र्य दिननिमित्त म्हणजेच १५आगस्टचे ध्वजारोहण चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारा प्रशांत पुरुषोत्तम पाटील ( मामू )यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
अमर संस्था संचालित मानव सेवा तीर्थ ही संस्था समाजातील दुर्लक्षित घटकासाठी अहोरात्र कार्य करीत आहे .सदर संस्था रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण , वेडसर लोकांसाठी दीपस्तंभचे कार्य करीत आहे .आतापर्यंत १०० मनोरुग्ण बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत तर सदयस्थितिला ५० मनोरुग्ण उपचार घेत आहेत , त्यांच्या सेवेत एन आर पाटील सह अनेक कार्यकर्ते सेवा देत आहेत .
दरवर्षी सदर संस्थेच्या ध्वजारोहण प्रसंगी समाजातील दुर्लक्षित घटकास आमंत्रित करुन ध्वजारोहणसाठी सन्मान दिला जातो .
संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष चंद्रकांत गुलाबराव पाटील हे असेच नवनवीन उपक्रम त्यांच्या संस्थेत घेत असतात.
समाजमनाची जाणीव ठेवत,
चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे श्री.प्रशांत पुरुषोत्तम पाटील(मामु)यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करणे हि खूप मोठी कौतुकास्पद बाब आहे .ही व्यक्ती समाजात दुर्लक्षित असून खूप मोठी जबाबदारी पूर्ण काम चोपडा उपजिल्हा रुग्णालयात करत आहेत.त्यांच्या कामाचा गौरव म्हणून त्यांना हा मान दिला आहे.
मानव सेवा तिर्थ दरवर्षी दुर्लक्षित पण समाजशील व्यक्ती द्वारे ध्वजारोहण केला जात असतो.
