१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि देशात एका नव्या युगाला सुरुवात झाली.पँरन्तु हे भेटलेले स्वातंत्र्य टिकविणे खुप महत्वाचे होते कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच पाकिस्तान ने भारतावर १९४८ साली आक्रमण केले आणि आपल्या सैनिकांनी प्राणपणाने लढून आपले शौर्य गाजविले शिवाय १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध,१९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध आणि पुन्हा १९९९ चे कारगिल युद्ध ज्यात भारतीय सैनिकांनी पाकिस्तानचा जबर पराभव केला. आपले सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून सीमेचे रक्षण करत आहेत म्हणून आपण सगळे सुखाने जगतोय तेव्हा १५ ऑगस्ट २०२० या वर्षी होणारा स्वातंत्र्यदिन अविस्मरणीय करण्याच्या उद्देशाने गावातील माजी सैनिकांप्रती कृतदयता भाव प्रकट करत शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यावेळी सत्कार करण्यात आला.पातोंडा गावातील
श्री.श्रीकृष्ण भदाणे,श्री.नाना चव्हाण,श्री.पांडुरंग शिंदे,श्री शालीक शिंदे,श्री.रामदास मोरे श्री.गोपाळ झंझने आणि श्री.शहीद दीपक चौधरी यांच्या वतीने त्यांच्या आई वडिलांनी सत्कार स्वीकारला. "एक दिवस सैनिक भावासाठी व त्याच्या परिवारासाठी" ही संकल्पना यावेळी राबविण्यात आली.आपल्या गावातील सैनिक कुटूंब हे आपलं आदराचं आणि अभिमानाचं स्थान आहे ही भावना ह्यावेळी तरुणांच्या चेहऱ्यावर झळकत होती.आणि देशाप्रती असलेली आपली सच्ची निष्ठा आणि कर्तव्यपूर्ण जबाबदारी कृती मधून सिद्ध होत होती.तेव्हा माजी सैनिकांना याचे कौतुक वाटले. त्यांच्या जीवनपट ड्युटी,सेवानिवृत्ती यांची माहिती घेत होतो तेव्हा आनंदाने त्यांचे मन भारावून गेले.यावेळी उपसरपंच सोपानभाऊ लोहार,सा.कार्यकर्ते घनश्याम पाटील,राकेश पाटील,सागर मोरे,,गिरीश पवार,हेमंत देशमुख,आनंद कुंभार,नितीन पारधी,उमेश चव्हाण,राहुल महाले,महेश निफाडकर,मुरलिधर बिरारी इत्यादी तरुण उपस्थित होते....
माझ्या संपूर्ण ३० वर्षाच्या कार्यकाळात हा सेवा निवृत्तीनंतर पहिला सत्कार होता.गावातील तरुणांमध्ये माजी सैनिक यांच्या बद्दल ही भावना प्रकट झाली. आणि आमच्या सेवेचे मोल हे एक देशप्रेमी व्यक्तीचं जाणू शकतो तेव्हा तरुणांचे कौतुक वाटले आणि मन भारावून गेले.
श्री.शालीक शिंदे(माजी सैनिक)
जेव्हा आ.माजी सैनिक यांच्या घरी गेलो त्यांच्या विषयी जाणून घेत होतो त्यांच्या सेवेविषयी,कार्यकाळ आणि सेवानिवृत्ती याबाबत ऐकत असताना अभिमान वाटत होता.आज आपल्याला नुसत्या देशाबद्दल गप्पा मारणे महत्वाचे नाही तर समाजात जगत असताना कृतदयता भाव प्रकट करून कृती युक्त जीवन जगणे महत्वाचे आहे. सैनिक आणि शेतकरी यांचा सन्मान करता आला पाहिजे.त्यांच्यामुळेच आपण आहोत ही भावना खूप महत्त्वाची आहे.तेव्हा राष्ट्रीय विकास परिषद,राजमाता जिजाऊ स्मारक समिती व गावातील अनेक उपक्रम हिरहिरीने राबविणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांची ही संकल्पना राबवित असताना आनंद वाटला.
:-श्री.घनश्याम पाटील(सा.कार्यकर्ते)

