अमळनेर:झाडी येथे सोसियल डीस्टनिंग राखत मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत शिवविवाह पद्धतीने विवाह समारंभ पार पडला या समारंभाला आमदार अनिल पाटील यांनीही उपस्थिती दिली.तसेच उपसरपंच भुपेंद्र नानभाऊ पाटील,पोलीस पाटील प्रवीण धनगर पाटील,ग्रामसेवक प्रमोद पाटील,नवरदेवचे काका सुभाष श्रीराम पाटील,आर बी पाटील,शिवाजी देवरे ,संतोष पाटील तसेच बहादरवाडी व झाडी येथील मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र श्रीराम पाटील यांचे चिरंजीव कुणाल व मनोहर युवराज पाटील यांची सुकन्या जयश्री यांचा विवाह समारंभ झाडी येथे नुकताच पार पडला यावेळी कोरोना या साथीच्या आजारामुळे 30 ते 35 पाहुणे उपस्थित होते तर सर्वांना मास्क लावले होते व सोसियल डिस्टनिंग राखले होते.हा विवाह समारंभ शिव विवाह पद्धतीने पार पडला अश्या विवाह समारंभाला आमदार अनिल पाटील यांनी भेट दिली.
...................................................
तर अमळनेर तालुक्यातील कोरोना या साथीच्या आजाराचे सर्व नियम पळत दोन विवाह धार येथे संपन्न झाले यात सुरेंद्र व रितू तसेच दीपक व चंचल यांचा विवाह पार पडला. धार गावाचे उपसरपंच शशिकांत बोरस,ग्राम पंचायत सदस्या मंगलाताई बोरसे,माजी उपसरपंच बाळकृष्ण नामदेव पाटील,पोलीस पाटील, जगतराव पाटील,हिम्मत गंभीर पाटील,ज्ञानेश्वर नवल पाटील यांनी भेट दिली.