त्यानुसार आज रोजी हा सोहळा संपन्न झाला, यावेळी आमदार अनिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत पाटील, कुमावत भाऊ यासह मान्यवर उपस्थित होते. वधू वर यांनी यावेळी आमदार अनिल पाटील यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीत ५०००/- रू. रक्कम व शिवभोजन थाळी केंद्र, अमळनेर येथे गरजुंना भोजनासाठी १०००/- रू. रोख रक्कम सुपूर्द केली.
साध्या पद्धतीने विवाह पार पाडून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधी व शिवभोजन केंद्रास अन्नदानास मदत दिल्याने सदर सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी आमदार अनिल पाटील यांनी बोलतांना आवाहन केले की रुग्णांवर होणारा अवाढव्य खर्च पाहता सर्व समाजातील नागरिकांनी याचा आदर्श घ्यावा जेणेकरून मुलीचे वडील अथवा मुलाचे वडील यांचा आवश्यक खर्च वाचेल व त्यातून काही रक्कम समाजपयोगी कामांसाठी उपयो होईल व खर्च वाचेल कन्येच्या विवाहपोटी अनेक जण कर्जबाजारी होतात व आत्महत्या करतात ही वेळ येणार नाही व दाम्पत्य देखील सुखात राहील असे आवाहन केले