अमळनेर (रिपोर्ट) आमदार स्मिताताई वाघ यांच्या सततच्या भागीरथी प्रयत्नामुळेच सोमवारी अक्कलपाडा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्याने वैशाख वणव्यात पांझरा नदी जिवंत होऊन खळखळून वाहू लागली आहे. हे पाणी अमळनेर तालुक्यात येत्या 3 ते 4 दिवसात पोहोचून पांझराकाठच्या गावांची तहान भागणार आहे. तसेच शेती, गुरे - ढोरे, पशु-पक्षी यांची मोठी अडचण दूर होणार आहे.

अमळनेर तालुक्यातील पांझराकाठचा पाणी प्रश्न दरवर्षी चिंता वाढविणारा असतो. त्यासाठी परिसरातील शेतकरी वर्गाने आमदार स्मिताताई वाघ यांना साकडे घातले होते. दर वर्षी होणाऱ्या पाणी टंचाईने पांझराकाठ तणावात असतो व दर वेळी आमदार वाघ या प्रशासनाशी संघर्ष करून पाठपुरावा करून आवर्तन द्यायला भाग पाडतातच. यंदाही वर्षी आमदार स्मिताताई वाघ यांनी धुळे जिल्हाधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अक्कलपाडा धरणातून आवर्तन द्यावे याचा तगादा लावला होता. तसेच शासन स्तरावर देखील पाठपुरावा केला होता. अशी माहिती किरण वारुळे व राकेश पाटील यांनी दिली.

आमदार वाघांचे यांचे परिसरातील नागरिकानी अभिनंदन करून मनापासून व्यक्त केले आभार

आमदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नास यश आले असून आज सोमवारी पांझरानदीत अक्कलपाडा धरणातून पाणी सोडण्यात आले. 3 ते 4 दिवसात ते पाणी तालुक्यातील गावांना पोचेल. त्यामुळे परिसरातील पिण्याच्या पाण्यासह, शेती, गुरे - ढोरे, पशु-पक्षी यांची मोठी अडचण दूर होणार आहे. वाढत्या उन्हात पाणी टंचाई निर्माण झाली. त्यात कोरोनाचा तणाव असल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. परंतु आमदार स्मिताताई वाघ यांनी सतत या प्रश्नांसाठी पाठपुरावा केला. म्हणून आमदार वाघांचे यांचे परिसरातील नागरिकानी अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.