अमळनेर-विधानसभा क्षेत्रातील पारोळा तालुक्यातील हिवरखेड़ा तांडा येथील सुमारे १०० मजुरांची त्यांच्या समवेत असलेल्या बैलासह गुजरात राज्यातील बारडोली येथून घर वापसी आ.स्मिता वाघ यांच्या माध्यमातून झाली आहे .त्यामुळे लॉकडॉउन च्या काळात मजूरांची होत असलेली उपासमार थांबली आहे.
हिवरखेड़ा येथील १०० महिला व पुरुष मजूर त्यांच्या समवेत असलेल्या ५० बैलासह गुजरात राज्यातील बारडोली जवळ साखर कारखान्यात ऊसतोड़ कामगार म्हणून गेले होते देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमी वर सुरु असलेल्या लॉकडॉउन मुळे गेल्या 23 मार्च पासून त्यांच् ठिकाणी अडकुन होते.लॉकडाउन मुळे काम बंद झाले असले तरी त्यात वाहतुक बंद असल्यामुळे घरी परत येन्याचे मार्ग बंद झाले त्यामुळे ह्या मजूरांची उपासमार होत होती.स्वतःची उपासमार होत असतांना समवेत असलेल्या मुक़्या जनावराच्या चाऱ्याची सोय होत नसल्याने मजूरांच्या अडचणीत वाढ झाली होती बाब हिवरखेड़ा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश पाटिल यांनी आ.स्मिता वाघ यांच्या निदर्शनात आणली आ.वाघ यांनी तत्काळ एरंडोल उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत चर्चा केली.याबाबत संबधित ठिकाणाचे जिल्हाधिकारी यांच्या समवेत संपर्क साधून मजूरांची यादी सादर करण्यात आली व ह्या मजूरांच्या घर वापसी चा मार्ग मोकळा झाला.मजूराना संबधित मुकादम चव्हाण व इंदल पवार यांच्या माध्यमातून वाहनात सोशल डिस्टसिग पाळत तसेच वैद्यकीय तपासणी नंतर गांवी रवाना करण्यात आले.नुकतेच ह्या मजूरांची घर वापसी झाली आहे.हिवरखेड़ा तांडा येथे आल्या नंतर संबधित मजूरांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
देशभरात लोकडॉउन २ आठवडया करीता वाढविन्यात आलेला असतांना आ.स्मिता वाघ यांच्या सूचकतेने व सूचनेनुसार प्रशासनाने तत्काळ कार्यवाही केल्याने संबधित मजूरांची घर वापसी झाली.मजूरानी व नागरिकांनी याबद्दल आ.स्मिता वाघ यांचे आभार व्यक्त केले आहे.